मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा – खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule Demands For Resignation Of Devendra Fadnavis: “राज्याचे गृहमंत्री नेमके काय करत आहेत? महाराष्ट्रात संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, सरकार काहीच काम करत नाही. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही? एका आमदाराच्या घरावर हल्ला होत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्रालयाची आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारची असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याच्या गृहविभागाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“एका विद्यमान आमदाराच्या घराची जाळपोळ तसेच माजलगावच्या पंचायत समितीची इमारत जाळपोळ करण्यात आली. हे राज्याच्या गृहविभागाचं अपयश आहे. महाराष्ट्र संकटात आहे. आजच्या परिस्थितीस ट्रीपल इंजिन सरकार जबाबदारआहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.” असे सांगत राज्यातील डरमळीत झालेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल खा. सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली.

“गेल्या एक महिन्यापासून मी सातत्याने गृहमंत्रालयाचं अपयश सांगत आहे. आज महाराष्ट्रात अस्थिर वातावरण आहे, हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पाप असल्याचं” खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकांना फसवायचं, लोकांना दुखवायचं, सत्तेचा गैरवापर करून इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीमार्फत लोकांना छळायचं काम सद्या सुरु आहे. प्रशासनासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही. गृहमंत्र्यांना हे सगळं झेपत नसल्याचे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवर टीका केली. महाराष्ट्रात संकटजन्य परिस्थितीबाबत चौकशीसुरु करण्याची मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना केली.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!