नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, 38 हजार 800 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

Narendra  Modi inaugurate Mumbai Metro Live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतल्या सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर हा कार्यक्रम होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मेट्रो मार्गिका 2- अ आणि 7 चं लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नव्या ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, सुमारे 400 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन असे विविध कार्यक्रम यावेळी होतील. तसंच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते  होणार आहे.