मुख्यमंत्र्यांनी संघावर टीका केल्याने पुण्यातील निष्ठावंत शिवसेना नेत्याचा पक्षाला रामराम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली. यामध्ये त्यांनी भाजपसह (BJP) राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील (RSS) टीका केली होती.

दरम्यान आता ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघ परिवारावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेतील एक नेते नाराज झाले असून, त्यांनी थेट शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पुण्यातील नेते आणि माजी शहरप्रमुख शाम देशपांडे (shyam Deshpande) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.

देशपांडे यांनी काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असे आपले प्रामाणिक मत असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला असल्याची आपली भावना असल्याचे देशपांडेंनी म्हटले आहे.

संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली आहे. त्यामुळे मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत असल्याचे शाम देशपांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.(shyam-deshpande-quit-party)