‘पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात, पण….’ नसिरुद्धीन शहांनी ‘मर्द’पणाचं समर्थन करणाऱ्यांवर डागली तोफ!

Naseeruddin Shah Reaction on Men Dominance Women Work : जेष्ठ बॉलीवूड अभिनेते नसिरुद्धीन शहा हे आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.  समाजातील पुरुषीपणा, पुरुषी अहंभाव आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम याकडे शहा यांनी लक्ष वेधले आहे.

नसिरुद्धीन शहा बी अ मॅन नावाच्या शो मध्ये मुलाखतीमध्ये पुरुषांनी दरवेळी आपणच कसे बरोबर आहोत हे सांगताना महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करु नये. पुरुष तीन – चार तासांचा प्रवास करुन कामावर जातात, थकून घरी येतात तेव्हा त्यांना असे वाटते की, ते जे म्हणतात त्यानुसार सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. पण घरातील महिला काही रिकाम्या बसलेल्या नसतात. त्याही काम थकून जातात. पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात.

घरकाम करणारी महिला ही अधिक वेगवेगळ्या आव्हांनांना सामोरी जाते. पुरुष एकदा घरातून बाहेर पडला की त्याला वाटते आपल्याकडून होणारे श्रमदान हेच मोठे आहे. त्याच्या तुलनेत बाकी काही नाही. त्याहून एखाद्या गृहिणीला खूपच श्रम करावे लागतात. पण आपण त्याकडे सोयीनं दुर्लक्ष करतो. त्यातही अनेकांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. अशा शब्दांत शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://www.youtube.com/shorts/QFN9YvQY9dg

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण