Uncle Percy Death: विश्वचषक सुरू असतानाच रोहितशी खास कनेक्शन असलेल्या सुपरफॅनचं निधन

Uncle Percy Death: ICC वनडे विश्वचषक 2023 चा 30 वा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Sri Lanka vs Afghanistan) यांच्यात पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. दरम्यान, श्रीलंकन ​​क्रिकेटला एक अत्यंत दु:खद बातमी मिळाली आहे. 30 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेच्या संघाने आपला सर्वात मोठा जबरा चाहता अंकल पर्सी कायमचा गमावला.

वयाच्या 87व्या वर्षी अंकल पर्सी यांनी कोलंबोमध्ये अखेरचा श्वास घेतला. बरेच दिवस आजारी असलेले अंकल पर्सी यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांचे डोळे ओलावले. श्रीलंका संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.

श्रीलंका संघाचे सर्वात मोठे चाहते अंकल पर्सी यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते श्रीलंकेच्या संघाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात असत, परंतु दीर्घकाळ आजारी असलेले अंकल पर्सी यांनी आज जगाचा निरोप घेतला.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना कोणत्याही स्टेडियममध्ये देशाचा झेंडा घेऊन संघाला पाठिंबा देण्याची परवानगी दिली होती. एवढेच नाही तर प्रत्येक क्रिकेटर त्यांना ओळखत असे. ते खेळाडूंशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये येत असे. अंकल पर्सी हे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) मोठे चाहते होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी रोहित श्रीलंकेला गेला होता, त्यावेळी अंकल पर्सी आजारी होते आणि रोहित शर्मा स्वतः त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

अंकल पर्सी यांच्या निधनानंतर श्रीलंका संघाचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याने शोक व्यक्त केला. त्यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “आम्ही अत्यंत दुःखाने जाहीर करत आहोत की आमचे प्रिय अंकल पर्सी राहिले नाहीत. तुम्ही पहिले सुपरफॅन होतास आणि तुम्ही आमच्या सर्वांसाठी नेहमीच खास राहाल.”

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला