महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे ३६ जिल्ह्यात ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ जाहीर…

NCP- राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा समन्वय प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे.

१४ जानेवारी रोजी या मेळाव्यांमध्ये महायुतीतील सर्व घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत तसेच संबंधित जिल्ह्यांचे सन्माननीय पालकमंत्री आणि मंत्री महोदय उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा मेळाव्यासाठी जिल्हा समन्वय प्रमुखांची यादी खालीलप्रमाणे – मुंबई शहर व मुंबई उपनगर – मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, पालघर – जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, ठाणे – जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, रायगड – आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरी – आमदार शेखर निकम, सिंधुदूर्ग – जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, पुणे – प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, सातारा – आमदार मकरंद पाटील, सांगली – जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, कोल्हापूर – माजी आमदार के. पी. पाटील, सोलापूर – आमदार यशवंत माने, धाराशिव – प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, लातूर – आमदार बाबासाहेब पाटील, बीड – माजी आमदार अमरसिंह पंडित, नांदेड – आमदार विक्रम काळे, परभणी – माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, हिंगोली – आमदार राजू नवघरे, जालना – जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, छत्रपती संभाजीनगर – आमदार सतीश चव्हाण, बुलढाणा – माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, वाशीम – जिल्हाध्यक्ष युसूफ पुजारी, अकोला – आमदार अमोल मिटकरी, अमरावती – प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, वर्धा – माजी मंत्री सुबोध मोहिते, नागपूर – गोंदिया – माजी आमदार राजेंद्र जैन, यवतमाळ – आमदार इंद्रनील नाईक, भंडारा – सरचिटणीस धनंजय दलाल, गडचिरोली – जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, चंद्रपूर – जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, नाशिक – आमदार दिलीप बनकर, अहमदनगर – आमदार संग्राम जगताप, धुळे – सरचिटणीस किरण शिंदे, जळगाव – जिल्हाध्यक्ष संजय पवार, नंदुरबार – जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आदी.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ