इनामी जमिनी ब्राह्मण समाजाच्या हक्काच्या – विश्वजीत देशपांडे

पुणे : ब्राह्मण समाजाला मिळालेल्या इनामी जमीन वर ब्राह्मण समाजाचा हक्क असून महाराष्ट्र बेकायदेशीर पद्धतीने ब्राह्मण समाजाला या जमिनीपासून वंचित करण्याचे षडयंत्र सुरू आहे त्याविरुद्ध परशुराम सेवा संघ आक्रमक लढा देणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर यांना पुराव्यांसह निवेदने देखील दिली आहेत संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे बोलत होते.

ब्राह्मण समाजाला विविध शासकाकडून उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही जमिनी वैयक्तिक इनाम मिळालेल्या आलेत. परंतु गेल्या काही वर्षात बेकायदेशीरपणे अशा इनामी जमिनी ज्या वैयक्तिक इनाम होते त्यांना वर्ग 2 देवस्थान इनाम नावाखाली हिसकावून घेण्याचे काम तत्कालीन शासनाने केले. त्यासोबतच अशा इनाम जमिनींना कुळ लावण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही तरीही अनेक ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या जमिनींना कुळ लावले गेले आहे.

यासंदर्भात संपूर्ण पुराव्यांसह राज्याचे महसूल मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे सादरीकरण देखील केले गेले परंतु राज्य सरकारची या प्रश्नावर अत्यंत उदासीन भूमिका असलेले गोरगरीब ब्राह्मण समाजावर अन्याय होत आहे हा अन्याय दूर करणे खरतर राज्य सरकारची जबाबदारी आहे. नुकतीच या संदर्भात परशुराम सेवा संघ इनाम जमिनी संदर्भातील कृती समितीची बैठक पुणे येथे संपन्न झाली या बैठकीत राज्य शासनाने पुढील एक महिन्यात निर्णय घ्यावा अन्यथा महसूल मंत्र्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

हे ही पहा: