Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना रात्री उशिरा अटक, आज कोर्टात हजर करणार

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

संजय राऊत यांना सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली आहे.