ब्राह्मणी प्रवृत्ती आणि विकृत हिंदुत्व म्हणजे काय हे दाखवून दिल्याबद्दल ‘काश्मीर फाईल्स’चे आभार!

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हा सिनेमा महाराष्ट्र राज्यात करमुक्त करावा अशी देखील मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, देशभरात चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरुन दोन गट पडलेले असतानाच पत्रकार निखील वागळे यांनी एक लक्ष्यवेधी पोस्ट फेसबुकवर केली आहे. ते म्हणाले, ब्राह्मणी प्रवृत्ती आणि विकृत हिंदुत्व म्हणजे काय हे दाखवून दिल्याबद्दल ‘काश्मीर फाईल्स’चे आभार! . या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी वागळे यांच्या या पोस्टचे समर्थन देखील केले आहे.

 

 

आणखी एका पोस्टमध्ये ते म्हणतात, काश्मीरी पंडितांचं विस्थापन निषेधार्ह. पण गेल्या ३२ वर्षात त्यांना किती नुकसानभरपाई मिळाली यावर चर्चा करु या? असं वागळे यांनी म्हटले आहे.