आदित्य ठाकरे हे अफजल खानाचे वंशज आहेत का? नितेश राणेंची खोचक टीका

Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj ) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे भारतात येणार आहेत, पण ही वाघनखे येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघ नखे खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल करत आक्षेप घेतला आहे. त्याला उत्तर देताना भाजप आमदार नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे हे अफजल खानाचे वंशज आहेत का? असा प्रश्न नीतेश राणेंनी (Nitesh Rane) केला. वाघनखं खरंच शिवरायांची आहेत का? हा प्रश्न करण्याचा नालायकपणा आदित्य ठाकरेंनी केलाय. अफझल खानचे वंशजच इतिहासावर प्रश्न निर्माण करू शकतात, अशी टीका नीतेश राणेंनी केलीय. यावेळी नीतेश राणेंनी मराठा मूक मोर्चावेळी सामना मूखपत्रात करण्यात आलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या सामना मूखपत्रात आमच्या मराठा समाजाच्या आई-बहिणीला हिणवणारं कार्टून काढायला लावलं होतं. तर त्यांचा कामगार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवरायांच्या गादीचे पुरावे मागितले होते. त्यांच्या वंशजाचे पुरावे मागितले होते. यामुळे आदित्य ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत का? याचे पुरावे मागितले तर चालतील का? म्हणून आमच्या शिवरायाचा तू अपमान केलास. ते वाघनखं आमच्या सारख्या मावळ्यांना चांगल्याप्रकारे वापरता येतात ते लक्षात ठेवावं, असा इशाराही त्यांनी दिलाय.

https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS

महत्वाच्या बातम्या-

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण