‘महाराष्ट्राची सत्ता बेअक्कल लोकांच्या हातात गेली आहे ज्यामुळे राज्य अधोगतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला’

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले. राणा यांना माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire)  यांनी उत्तर दिले आहे. खासदार नवनीत राणा काहीही बोलतात, आम्ही शिवसैनिक आहोत, आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो.” असा धमकी वजा इशारा खैरे यांनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.

आता सहन होत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही. त्या बाई काय होती, कोण होती हे मला सर्व माहित आहे. आधी राष्ट्रवादीने सपोर्ट केला आता भाजप सपोर्ट करत आहे. या बाई म्हणजे पक्ष बदलणाऱ्या बाई असल्याची टीका खैरे यांनी केली आहे.

दरम्यान, खैरे यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh rane)  यांनी टीका केली आहे. राष्ट्रपती साहेब सत्ताधारी स्वतः म्हणत आहेत त्यांना अक्कल नाही, राष्ट्रपती राजवट ची तयारी करावी. महाराष्ट्राची सत्ता बेअक्कल लोकांच्या हातात गेली आहे ज्यामुळे राज्य अधोगतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे म्हणून याची आपण गंभीर दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा. असं राणे म्हणाले आहेत.