सानिया मिर्झाला किती करोडोंची पोटगी मिळणार? जाणून घ्या किती मिळू शकते रक्कम…

Sania Mirza Divorce: क्रीडाविश्वातील बहुचर्चित कपल सानिया मिर्झा आणि शोएब मलिक (Shoaib Malik) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) लग्न केल्यामुळे त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती आता समोर आली आहे. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने त्याच्याकडून खुला घेतल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आता एक वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे. शोएबपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाला किती रक्कम पोटगी म्हणून मिळेल, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शोएब मलिकची गणना पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. शोएब मलिकची एकूण संपत्ती २८ मिलियन डॉलर आहे, म्हणजेच तो २३० कोटींचा मालक आहे असे आता समोर येत आहे.

शिवाजी मानकर

सानिया मिर्झा ही टेनिस स्टारही राहिली असून ती क्रीडा विश्वातील व्यक्तिमत्त्व आहे. अशा परिस्थितीत शोएबच्या पहिल्या पत्नीपेक्षा सानिया मिर्झाला जास्त पोटगी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शोएब मलिककडून सानियाला किमान १५ कोटी रुपये तरी निश्चितच पोटगी मिळू शकते, असे आता समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा