कोकणातील ढाण्या वाघ परतला; नितेश राणेंनी केले जिल्हा बँकेतील विजयाचे जोरदार सेलिब्रेशन

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झालीय, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अतुल काळसेकरांनी बाजी मारलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत 11 विरुद्ध 8 मतांनी दोघांचा विजय झाला. या नंतर या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आता भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना, गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते. नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात असताना आज अखेर नितेश राणे हे प्रकट झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, भाजपने मोठा विजय नोंदवला, मात्र तरीरी नितेश राणे अटकच्या टांगत्या तलवारीमुळे कुणासमोरही आले नव्हते मात्र न्यायलयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने नितेश राणे तब्बल 15 दिवसांनी समोर आले.

तत्पूर्वी, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय यासंबंधी सोमवारी फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी हा खटला सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना म्यॉव म्यॉव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करणयात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीनं करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचं राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे.