‘अब्दुल सत्तारने जे काही तोंडाचे गटार उघडून स्वतःची लायकी दाखवली आहे त्यानंतर पुन्हा एकदा लंका दहन निश्चित आहे’

मुंबई – सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मशिदीवरील भोंगे ( The horn on the mosque ) आणि हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणाच्या विषयावरून वातावरण आणखी चिघळलं आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी प्रभु हनुमानाबद्दल आक्षेपार्ह केला असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सत्तार यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे. नितेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांचा 2017 मधील जुना व्हिडीओ व्हायरल करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सत्तार यांनी या व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, रावणाला सत्तेचा माज चढला होता… हनुमंताने पूर्ण लंका जाळून टाकली आणि हा माज उतरवला…हनुमान चिरंजीवी आहे.. अब्दुल सत्तारनी जे काही तोंडाचे गटार उघडून स्वतःची लायकी दाखवली आहे त्यानंतर पुन्हा एकदा लंका दहन निश्चित आहे… असं त्या म्हणाल्या आहेत.