टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगटच्या पीएनेच रचला हत्येचा  कट?

नवी दिल्ली –  भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचे 23 ऑगस्ट रोजी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोनालीच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वृत्तावर तिच्या बहिणीने संशय व्यक्त केला होता आणि हा मृत्यू सामान्य नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी त्यांच्या पुतण्याने एक मोठा खुलासा केला आहे.(How did Sonali Phogat die?)

सोनाली फोगटचा (Sonali Phogat) पुतण्या अॅडव्होकेट विकास याने तिच्या मृत्यूसाठी तिचे स्वीय सचिव सुधीर सांगवान यांना जबाबदार धरले आहे. सुधीर सांगवान यांनी सोनाली फोगटच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप वकील विकास यांनी केला आहे. इतकंच नाही तर सुधीर सांगवान यांच्या सांगण्यावरून फार्म हाऊसमधून लॅपटॉप आणि जीवनावश्यक वस्तू घेतल्या असून त्यामध्ये सर्व डेटा आणि जमीन आणि मालमत्तेची कागदपत्रेही जतन करण्यात आल्याचे विकास सांगतात. सुधीर सांगवान यांच्याशीही संभाषण झाले होते आणि सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत ते वारंवार आपले विधान बदलत असल्याचे वकील विकास यांचे म्हणणे आहे.