संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, मी अजून शिवसेनेतच आहे – शिवतारे

Mumbai – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे,असं विधान शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केलं आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut)शिवसेनेची वाट लावली, मी अजून शिवसेनेतच आहे, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)असल्याची टीका बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, माझं असं मत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही. ही काही टीका नाहीये, पण ज्याप्रमाणे ते वर्तन करत आहेत. त्यांनी पुढे जाऊन असं वर्तन करून नये.