Prarthana Behere | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या हस्ते सुरेखा मते महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित

पुणे : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) यांच्या हस्ते संपादिका सुरेखा मते (Surekha Mate) यांना महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच स्विफ्टएनलिफ्ट मीडियाच्या वतीने ‘महाराष्ट्र बिजनेस अचिव्हर्स अवाॅर्ड २०२४’ पुरस्कार सोहळा पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे आयोजिला होता.

उद्योग विश्वातील यशस्वी, तसेच कठीण परिस्थितीतही न डगमगता, धीराने व धाडसाने यश मिळवणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संयोजक निलेश साबे यावेळी उपस्थित होते.

प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, (Prarthana Behere) “माझी सुरूवातीची वाटचाल पत्रकारीतेच्या माध्यमातून झाली होती. तुम्हाला हा पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्याच क्षेत्रातील व्यक्ती माझ्याच हस्ते सन्मानित होत आहे, याचा मला आनंद वाटतो.” सुरेखा मते म्हणाल्या, पुरस्कार मिळणे म्हणजे जबाबदारीत वाढ होणे आहे. निलेश साबे आणि प्रार्थना बेहेरे यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदारीत अधिक वाढ झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या बिझनेस ॲवॉर्डच्या माध्यमातून उद्योजकांना आपला व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवता येतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या उद्योजकांची ओळख होऊन व्यावसायिक संबंध तयार होतात. शाबासकीची थाप माणसाला पुढील यशाच्या अनेक पायऱ्या चढण्याची उमेद देते, असे निलेश साबे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन