नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं धडा शिकवल्यामुळे विरोधक सैरभैर झाले?

संसदेच्या सुरक्षितता भंग प्रकरणी काल पुन्हा दोन्ही सदनांमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं लोकसभेतील 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी सोमवारी दोन्ही सदनांमधील मिळून 78 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काल संसद सुरक्षितता भंग प्रकरण आणि त्याचबरोबर या 78 खासदारांवर झालेल्या निलंबन प्रकरणावरूनही उर्वरित सदस्यांनी सदनामध्ये गदारोळ सुरूच ठेवला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पंतप्रधानांची विपर्यस्त स्वरूपातील छायाचित्रे असलेली पत्रकं ठिकठिकाणी लावल्यावरून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं धडा शिकवल्यामुळे विरोधकांना सगळीकडे हार पत्करावी लागली असून त्यामुळे आलेल्या निराशेतून विरोधक अशी कृत्य करत असल्याचं जोशी म्हणाले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. मात्र ती न जुमानता गोंधळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज नियमांनुसारच चालेल, असं सभापतींनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले