मी अडीच दिवस हनुमान चाळीसा ऐकली, म्हणून ‘ती’ खेळी करु शकलो; गंभीरचे लक्षवेधी वक्तव्य

Gautam Gambhir: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर कधी त्याच्या वक्तव्यामुळे तर कधी त्याच्या रागामुळे चर्चेत असतो. यावेळी, आशिया चषकात (Asia Cup 2023) समालोचन करताना, गंभीरने एक विधान केले जे खूप ट्रेंड करत आहे. माजी सलामीवीर म्हणून गौतम गंभीरने टीम इंडियासाठी मॅच-विनिंग इनिंग खेळली होती.

टी20 विश्वचषक 2007 चा फायनल असो किंवा 2011 च्या वनडे वर्ल्ड कपचा फायनल असो, प्रत्येक महत्वाच्या सामन्यात गौतम गंभीरची बॅट गर्जत होती. या दोन्ही टूर्नामेंटमधली त्याची मॅच-विनिंग इनिंग सगळ्यांनाच माहीत आहे, पण एक इनिंग अशीही होती ज्याबद्दल लोकांना माहिती आहे, पण ती इनिंग कशी आली हे सगळ्यांना माहीत नाही.

2009 मध्ये नेपियर येथे न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) कसोटी सामन्यात गौतम गंभीरने 137 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली, जी खेळण्यासाठी त्याला अडीच दिवस लागले. या झंझावाती खेळीला 14 वर्षे झाली आहेत, पण गंभीरने नुकतीच या खेळीमागची कहाणी उघड केली.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर इरफान पठाण आणि जतिन सप्रू यांच्यासमोर आपल्या करिअरशी संबंधित एक खुलासा केला. गंभीरने मार्च 2009 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या नेपियर कसोटीची आठवण सांगितली. या सामन्यात गंभीरने मॅरेथॉन खेळी खेळली, जी इतिहासाच्या पानांमध्ये कायमची नोंद झाली. टीम इंडियाला या टेस्टमध्ये फॉलोऑन मिळाला होता, त्यानंतर गौतम गंभीरने अडीच दिवस बॅटिंग केल्यानंतर ही टेस्ट ड्रॉ केली. दुसऱ्या डावात गंभीरने एकूण 643 मिनिटे फलंदाजी करत 436 चेंडूत 137 धावा केल्या, ज्यात एकूण 18 चौकारांचा समावेश होता.

या खेळीबाबत गौतम गंभीरने नुकताच खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मी अडीच दिवस दुपारच्या जेवणात, चहात, माझ्या खोलीत आणि सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण वेळ रात्रभर हनुमान चालीसा ऐकली. तो मंत्र ऐकल्यानंतर मी हा डाव खेळू शकलो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.”

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !