जगातील ‘या’ देशात वेश्याव्यवसाय कायदेशीर; बिनधास्तपणे करता येतो देहाचा व्यापार 

Prostitution Law India:  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वेश्याव्यवसाय केवळ भारत आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्येच नाही तर जगभरात केला जातो. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मुलगी स्टँडअप कॉमेडी दरम्यान वेश्याव्यवसायाला छान काम म्हणताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ते कायदेशीर मानले जाते का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. जगातील कोणत्या देशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे? आणि नेमकी काय स्थिती आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

ग्रीसमध्येही वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, पण या देशात सेक्स वर्कर्सना स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागते. सेक्स वर्करसाठी (Sex Worker) ओळखपत्र देखील आहे. ऑस्ट्रियामध्ये वेश्याव्यवसाय पूर्णपणे कायदेशीर घोषित करण्यात आला आहे. या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी किमान वयोमर्यादा १९ वर्षे बंधनकारक करण्यात आली आहे. सेक्स वर्कर्स देखील कर भरतात. त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणीही करून घ्यावी लागते.

जर्मनीमध्ये वेश्याव्यवसायाच्या विरोधात कठोर कायदे आधीच अस्तित्वात आहेत, परंतु या देशात वेश्याव्यवसाय अजूनही कायदेशीर आहे.दुसऱ्या बाजूला  सेक्स वर्कर्सना जर्मनीमध्ये ग्राहक शोधण्याची परवानगी नाही. अॅमस्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आहे. नेदरलँड त्याच्या रेड लाइट एरियासाठी जगभरात ओळखले जाते. जगातील इतर देशांमध्ये  पर्यटक विशेषतः रेड लाइट एरिया पाहण्यासाठी येतात.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर