अंजनडोह ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या पल्लवी अमोल शेळके बिनविरोध निवड

Karmala – अंजनडोह ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या सौ. पल्लवी अमोल शेळके बिनविरोध निवडून आल्या असून माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आज जेऊर ता. करमाळा येथे सत्कार करण्यात आला.

करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून यंदा जनतेतून सरपंच पदाचा उमेदवार निवडला जाणार असल्याने या पदासाठी सर्वच ठिकाणी चुरस निर्माण झालेली उमेदवारी अर्जांच्या संख्येवरून दिसून येते. परंतू अशा स्थितीत माजी आमदार नारायण पाटील गटाने बाजी मारली असून जनतेतील सरपंच पद बिनविरोध आपल्या कडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.

सौ. पल्लवी अमोल शेळके यांचा एकमेव नामांकन अर्ज सरपंच पदासाठी आल्याने त्यांची निवड बिनविरोध झालीच परंतू उर्वरित सदस्यांच्या निवडीही अंजनडोह ग्रामस्थांनी राजकीय गटांचा मेळ घालून बिनविरोध केल्या आहेत.ग्रामपंचायत सदस्यांमध्ये माजी आमदार शामलताई बागल गट, माजी आमदार जयवंतराव जगताप गट व माजी आमदार नारायण पाटील गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून देण्यात आले आहेत.

आज जेऊर ता. करमाळा येथे नूतन सरपंच सौ. पल्लवी शेळके, नूतन सदस्य कालिदास ढेरे, उद्धव गावडे, राजेंद्र सरतापे, देविदास शिंदे, प्रभाकर माने, कचरदास रणदिवे, श्रीरंग रणदिवे, धोंडीराम शिंदे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अरुण शेळके, डाॅ. अशोक शेळके, सुभाषकाका बलदोटा, शहाजी माने, पोपट शिंदे, बिभीषण साळुंखे, औंदुंबर शेळके, धनराज शिंदे, नामदेव गावडे, शिवाजी माने, दिपक शेळके, आप्पा शिंदे, विकास सलगर, नवनाथ शेळके, नितीन शेळके, रेवननाथ दुरगुडे, दादासाहेब गोरे, अर्जुन शेळके, दयानंद शिंदे, विलास शिंदे, धर्मराज शिंदे, आशिष शिंदे, सुदाम गोडगे आदि उपस्थित होते. सत्कारानंतर गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.