‘वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त पदरात काही पडलं नाही’

मुंबई : पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Elections result 2022) हाती येत आहेत. गोव्यात भाजप-काँग्रेस यांच्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीच्या कलांमध्येच शिवसेनेची प्रचंड पिछेहाट होताना दिसत आहे. त्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) चिमटा काढला आहे.

“वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं. तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच…” असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.