Pandharinath Phadke | ‘छकडा फेम’ गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांचे निधन, पनवेलच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Pandharinath Phadke Death: बैलगाडा शर्यत म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येणारे नाव म्हणजे पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke). महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असुद्यात, तिथे हा नेहमी दिसायचा. मात्र आता हाच चेहरा आपल्यातून कायमचा नाहीसा झाला आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटेनेचे अध्यक्ष आणि गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या पंढरीनाथ फडके (Pandharinath Phadke) यांचे निधन झाले आहे. पनवेल येथील रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

पनवेलच्या विहिघर येथील असलेल्या पंढरीनाथ फडके यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड. शर्यतीच्या 40 हून जास्त बैलं त्यांच्याकडे होती. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते. शर्यतीत जिंकणाऱ्या बैलाला हव्या त्या किंमतीत विकत ते घ्यायचे. एकदा त्यांनी 11 लाख रुपये देऊन त्यांनी एक जिंकलेला बैल खरेदी केला होता. त्यावरून त्यांना बैलगाडा शर्यतीचा आणि बैलांची किती आवड होती हे लक्षात होतं.

पंढरीनाथ फडके हे त्यांच्या लूकसाठीही प्रचंड प्रसिद्ध होते. त्यांच्या गळ्यात आणि अंगावर इतकं सोनं असायचं की कुणाचीही नजर त्यांच्याकडे जायची. त्यामुळे महाराष्ट्रातील गोल्डमॅन अशीही त्यांना ओळख मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल