पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याऱ्या ST कर्मचाऱ्यांबाबत परबांचे मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांना…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेता येणे शक्य नसल्याचं मोठं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केलं आहे.

22 तारखे पर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार केला जाईल असही ते म्हणाले. 5 महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ (ST Corporation) बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे असं देखील ते म्हणाले.