‘लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले’

Pune – राज्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दोन्ही मतदारसंघातील निवडणुका सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यापैकी कसबा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे अकरा हजार चाळीस मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत.

दरम्यान, आज मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासशी बोलताना रवींद्र धंगेकरांनी मोठं विधान केलं आहे. “लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपाला जनतेनं कात्रजचा घाट दाखवलाय”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.