स्ञीशक्ति देवतेच्या नगरीत पहिली महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा घेण्याची कुस्तीप्रेमींची मागणी

तुळजापूर – तिर्थक्षेञ तुळजापूरात पुर्वी शाकंभरी नवराञोत्सवात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतली जात होती. ती बंद झाल्याने आता पहिली महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा घेवून कुस्ती स्पर्धची खंडीत परंपरा पुनश्च सुरु करण्याची मागणी कुस्ती प्रेमींमधून मागणी होत आहे.

पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेदरम्यान कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा भरवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत स्पर्धा घ्या, महाराष्ट्र सरकार सर्व आर्थिक सहाय्य करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली होती.

या पार्श्वभूमीवर पहिली महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा स्ञीशक्ती देवता श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीत घेण्याची मागणी कुस्ती प्रेमींमधून केली जात आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात पौष महिन्यातील श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतल्या जात, याला हिंदकेसरी पै कै हरिचंद्र बिराजदार आवर्जून उपस्थितीत राहत. कालातरांने दुष्काळ परिस्थिती पार्श्वभूमीवर कुस्ती स्पर्धा घेणे बंद झाले.

आता भरपूर पाऊस झाल्याने पहिली महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा भरवुन पुनश्च तिर्थक्षेञी कुस्ती खेळास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होत आहे. 1917ला शिवजयंती निमित्ताने देविचे पुजारी प्रविण नरहरी कदम यांनी घेतलेल्या महिला कुस्ती स्पर्धत ८ आंतरराष्ट्रीय १७५ महिला मल्ल सहभागी झाल्या होत्या.

या महिला कुस्ती पटू तिर्थक्षेञी होणाऱ्या कुस्ती स्पर्धा सहभाग बाबतीत बोलताना म्हणाल्या होत्या की, स्ञीशक्ती तुळजाभवानी दारी कुस्ती खेळण्यास येणे म्हणजे देवीदर्शन म्हणजे देवीची कुस्तीरूपातुन सेवा करणे तिचा आशिर्वाद घेणे हा आमचा उद्देश असतो. जिंकणे हारणे ही बाब या पुण्यनगरीत आम्ही गौण समजतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.