हिंदुत्वाचा जन्म कधी झाला माहीत नाही? INDIA आघाडीतील नेत्याने ओकली गरळ

Hindu Dharma : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांनी धर्माच्या नावावर भाकरी भाजण्यास सुरुवात केली आहे.अलीकडेच तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi Stalin) यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आणि ते संपवण्याची भाषा केली. ताज्या घडामोडीत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा (G Parmeshwara) यांनी हिंदू धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, बौद्ध आणि जैन धर्माची सुरुवात सर्वांनाच माहिती आहे, परंतु हिंदू धर्माची सुरुवात कधी झाली असा प्रश्न आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार ते म्हणाले, “जगाच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले आहेत. येथे जैन आणि बौद्ध धर्माचा जन्म झाला. हिंदू धर्माचा जन्म कधी झाला आणि त्याची सुरुवात कोणी केली हा अजूनही प्रश्न आहे. आपल्या देशातील बौद्ध धर्माचा इतिहास आहे. जैन धर्माचा उगम. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म परदेशातून आपल्या देशात आले. जगातील सर्व धर्मांचा सारांश मानवजातीच्या भल्यासाठी आहे.” एकंदरीत इंडिया आघाडीतील नेते वारंवार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असल्याचे समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole