नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील, शिवसेनेबाबतच्या निकालावर शरद पवारांचे भाष्य

मुंबई- राजकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन सुरू असलेल्या वादाबाबत आज अखेर अंतिम निर्णय लागला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी हा वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला, लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.