सीबीआयनं बनावट पासपोर्ट बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

fake passport – केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं (CBI) पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील एका मोठ्या पासपोर्ट टोळीच्या कारवाया उघडकीस आणल्या असून गंगटोकमधील पासपोर्ट लघु सेवा केंद्रा मधील वरिष्ठ अधिक्षक आणि आणखी एका व्यक्तीला 1 कोटी 90 लाख रुपयांच्या कथित लाच प्रकरणात अटक केली आहे.

कोलकाता इथले पारपत्र उप अधिकारी, यांच्यासह वरिष्ठ अधीक्षक, पारपत्र लघु सेवा केंद्र, गंगटोक, इतर सार्वजनिक सेवक आणि खाजगी व्यक्ति अशा 24 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक पारपत्र कार्यालय कोलकाता आणि पारपत्र लघु सेवा केंद्र गंगटोकच्या कर्मचाऱ्यांवर मध्यस्थ आणि इतरांसह गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.

हे आरोपी काही पैशांच्या मोबदल्यात अनिवासी भारतीय अर्जदारांच्या वतीनं मध्यस्थांनी सादर केलेल्या खोट्या आणि बनावट ओळखीच्या कागदपत्रांच्या आधारे पारपत्र देत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा