राजसाहेब- उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…; सेनाभवनाबाहेर ठाकरे बंधूंना साद घालणारे बॅनर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे.  राजभवन येथील दरबार हॉलमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Deputy Chief Minister Ajit Pawar) घेतली. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हात मिळवला आहे.

या मोठ्या राजकीय नाट्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे (Raj Thackeray) या बंधूंनी एकत्र यावे, अशी साद मनसैनिकांनी घातली आहे. सेना भवनाबाहेर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी करणारे बॅनर झळकावण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला…. राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकले आहेत. मनसेचे लक्ष्मण पाटील यांनी हा बॅनर लावला आहे.