Yuvraj Singh | ‘मी तर त्याला उपकर्णधार बनवलं असतं…’ रोहित-हार्दिक कर्णधारपदाच्या वादावर युवीचे धडाकेबाज विधान

Yuvraj Singh | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या नवीन हंगामात मुंबई इंडियन्स एका नवीन कर्णधारासोबत खेळणार आहे. आयपीएल 2024 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असेल. ही माहिती शेअर करताना फ्रँचायझीने माजी कर्णधार रोहित शर्माचे उत्कृष्ट योगदानाबद्दल आभार मानले. त्यावर अनेक बाजूंनी टीका आणि अनेक बाजूंनी प्रशंसा झाली. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही यावर मोठे वक्तव्य केले आहे.

युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला, “रोहित शर्मा हा 5 वेळा आयपीएल चॅम्पियन आहे. त्याला काढून टाकणे हा मोठा निर्णय होता. त्याने हार्दिक पांड्याला घेतले. पण जर मी असतो तर मी रोहितला आणखी एक हंगाम दिला असता आणि हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवले असते आणि संघाला तो कसा हाताळतो हे पाहिले असते. मला फ्रेंचायझीचा दृष्टिकोन समजतो. आपल्या संघाच्या चांगल्या भविष्यासाठी ते हे करत आहे. पण पुन्हा तेच, रोहित शर्मा अजूनही भारताचा कर्णधार आहे आणि चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे हा एक मोठा निर्णय आहे.”

158 सामन्यात कर्णधार असताना रोहित शर्माने 87 सामने जिंकले आहेत तर 67 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या महान कर्णधाराची विजयाची टक्केवारी 55.06 होती. मुंबई संघाने आतापर्यंत जी 5 विजेतेपदे जिंकली आहेत ती देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आली आहेत. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये या अनुभवी खेळाडूने संघाला आयपीएल चॅम्पियन बनवले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार