विश्वचषकापूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाज पृथ्वी शॉचा धमाका, द्विशतकानंतर झळकावले शतक

Prithvi Shaw Back To Back Hundred : भारतीय संघाच्या बाहेर असलेला स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आपल्या फलंदाजीने इंग्लंडमध्ये वादळ आणले आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट वन-डे चषक खेळत आहे. 13 ऑगस्ट रोजी डरहम विरुद्ध नॉर्थम्प्टनशायर यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने शानदार दुहेरी शतक झळकावून सर्वांची वाहवाह लुटली होती. यानंतर आता त्याने पुन्हा एकदा शतक झळकावत यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आपला दावा पक्का केला आहे.

पृथ्वी शॉने काऊंटी क्रिकेट वनडे कप 2023 मध्ये त्याने दमदार कामगिरी केली. त्याने 4 डावात 429 धावा केल्या आहेत. सोमेरसेटविरूद्धच्या सामन्यात त्याने 153 चेंडूत 244 धावांची तडाखेबाज द्विशतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे नॉर्थम्पटनशायरने 87 धावांनी सामना जिंकला होता. यानंतर आता दुसऱ्या सामन्यात 125 धावांची खेळी केली आहे. पृथ्वी शॉने नॉर्थम्प्टनशायर संघासाठी अप्रतिम सुरुवात केली आणि 76 चेंडूत 125 धावांची नाबाद खेळी खेळली. पृथ्वी शॉने या खेळीत 7 षटकार आणि 15 चौकार लगावले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 164 होता. या त्याच्या खेळीचे भारतात विशेष कौतुक झाले.