१७ डिसेंबरला बसणार जब्याचा ‘फ्री हिट दणका’

१७ डिसेंबरला बसणार जब्याचा 'फ्री हिट दणका'

मुंबई : २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली असून लवकरच प्रेक्षक आता आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये बसून घेतील.

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao

Previous Post
भक्तिरसाचा महिमा, दीड तास अनुभवा ! सोनी मराठीवर२५ ऑक्टोबरपासून, संध्या. ६.३० वाजल्यापासून

भक्तिरसाचा महिमा, दीड तास अनुभवा! सोनी मराठीवर२५ ऑक्टोबरपासून, संध्या. ६.३० वाजल्यापासून

Next Post
‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

‘50 टक्के क्षमतेने नाट्यगृह उघडणार असतील तर सर्व निर्मात्यांना पण अर्धे भाडे माफ करावे’

Related Posts

सुक्ष्म व लघु उद्योगांना विनातारण कर्ज आता मिळणार पाच कोटी पर्यंत -प्रदीप पेशकार

Mumbai – लघुउद्योग क्षेत्रासाठी भारत सरकार तर्फे अतिशय सकारात्मक व गरजेचे पाऊल उचलले गेलेले आहे. प्रामुख्याने सूक्ष्म लघु…
Read More
स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला किस्सा

स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला किस्सा

Ajit Pawar | राज्यातील बारामती विधानसभा लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. येथून काका अजित पवारांच्या विरोधात पुतण्या युगेन्द्र…
Read More

“जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार”, अजित पवार यांचे स्पष्टीकरण

मुंबई – कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत…
Read More