विभास साठेंना सुरक्षा पुरवा, त्यांचा ‘मनसुख’ होण्याची भीती : सोमय्या

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावर नुकताच छापा टाकण्यात आला होता. आता याच विभास साठेंचा (Vibhas Sathen) मनसुख हिरेन (Mansukh Hiren) होऊ शकतो अशी भीती भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्यक्त केली आहे.विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना (Director General of Maharashtra Police) पत्र लिहीले आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे मनसुख हिरण होऊ नये. विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.

विभास साठे कोण आहेत ?

अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉटसाठी जमीन खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीचं (ED) पथक पुण्यात पोहोचलंय. साठे यांच्याकडून1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केला.