पुणेकरांनो सावधान : ‘या’ वेळी मुसळधार वृष्टी होण्याचा हवामान विभागाचा इशारा 

Pune Rain alert : उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र तरीही महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस पडलेला नव्हता. मात्र आता राज्यात देखील पावसाचा जोर पाहायला मिळू लागला आहे. यातच आता पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि प्रामुख्यानं घाट माथ्यावर आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं त्या परिसरातील रुग्णालयं, दवाखाने आणि पोलीस, तसंच महसूल यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे तालुक्यातील महसुली अधिकारी, तसंच रुग्णालयातील कर्मचारी वर्गानं आपापली मुख्यालयं सोडून न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती निवारण दलानंदेखील सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी शक्यतो त्या परिसरात जाण्याचं टाळावं आणि जाणं गरजेचं असल्यास योग्य सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. टर, तर लवासा परिसरात 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, राज्यात इतरत्र जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सावित्री नदीनं महाडमध्ये आणि पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. काल रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानं महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.