विश्वंभर चौधरींचा विरोधकांच्या आघाडीला जाहीर पाठींबा; म्हणाले, एनडीएचा भारत सत्यनाशाकडे जाणारा

Pune – पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या २६ पक्षांची बंगळुरू येथे बैठक झाली. दुसरीकडे मंगळवारी सायंकाळी दिल्लीत भाजपप्रणित एनडीए आघाडीची बैठक झाली. एनडीएच्या बैठकीत एकूण 38 पक्ष सहभागी झाले होते. विरोधकांच्या बैठकीत एनडीएचा मुकाबला करण्यासाठी एक नवीन आघाडी तयार करण्यात आली, ज्याचे नाव INDIA असे ठेवण्यात आले आहे. INDIA चा अर्थ इंडियन नेशनल डेवेलपमेंटल इंक्लूसिव अलायंस असा असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या विरोधकांच्या आघाडीला आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Chaudhary) यांनी पाठींबा दिला आहे. सोबतच त्यांनी पाठींबा देताना कारण देखील सांगितले आहे. एनडीए विरूद्ध इंडिया यात मी इंडियाच्या बाजूनं आहे कारण एनडीएचा भारत आणि आपला भारत वेगवेगळा आहे असा दावा चौधरी यांनी केलाय.

एनडीएचा भारत द्वेष आणि हिंसेचा आधार घेऊन सत्यनाशाकडे जाणारा भारत आहे. तुम्हाला कोणाचा भारत पाहिजे? गांधीजींचा प्रेम आणि अहिंसायुक्त भारत की सावरकर, हेडगेवार, गोळवलकरांचा द्वेष आणि हिंसायुक्त भारत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.