आता पिडीत तरुणीने पुन्हा एकदा केले रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आता आणखी एकदा नाट्यमय वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते यानंतर काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत मदतीसाठी उभा राहिलेल्या भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.आता या तरुणीने पुन्हा रघुनाथ कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याच्या कडून पीडित तरुणीवर दबाब आणला जात असल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. गुन्हा मागे न घेतल्यास शरीर संबंधांचे व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देखील देण्यात येत आहे. कुचिक याने काही व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. याप्रकरणात मला मदत मिळावी म्हणून मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, असे देखील यावेळी पीडित तरुणीने म्हटले आहे.

दरम्यान, रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्याऱ्या पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. तसेच कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याच माणसांनीच आपले अपहरण करुन गोव्याला नेल्याचाही आरोपही या तरुणीने केले आहे.