Rahul Gandhi | हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांतीनंतर ‘महिला न्याय गॅरंटी’ देण्याचे काँग्रेसचे ऐतिहासिक पाऊल

Rahul Gandhi | भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ घोषणा केल्या असून यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी जाहीर केले.

महिला हक्क न्याय परिषदेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुमधडाक्यात महिला आरक्षण जाहीर केले, जल्लोषही केला परंतु हे आरक्षण सर्वे केल्यानंतर लागू होईल म्हणजे १० वर्षानंतर परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल. विधानसभा, लोकसभेसह सर्व ठिकाणी महिलांची भागिदारी वाढली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. महालक्ष्मी योजनेचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील अरबपतींना १६ लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष महिलांना मदत करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. महिला न्याय गॅरंटी हे देशाच्या इतिहासात क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्वे करुन प्रत्येक विभागात महिला, दलित, अल्पसंख्याक, मागास समाजाची किती भागिदारी आहे हे तपासणार आहे. काँग्रेसने हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांती करुन इतिहास घडवला आणि आता जातनिहाय जनगणना करून जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी हे सुत्र आमलात आणणार आहे. युपीए सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस सिलिंडर नरेंद्र मोदींना महाग वाटत होता पण त्यांच्या सरकारने तो ९०० रुपये केला तरीही त्यांना तो महाग वाटत नाही. हिंदुस्थानचे सरकार ९० लोक चालवतात त्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास समाजाचे लोक अत्यल्प आहेत. सर्व क्षेत्रात या समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी आहे आणि हेच चित्र काँग्रेस पक्षाला बदलवायचे असून ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा भागिदारी हे सुत्र लागू करायचे आहे असे राहुल गांधी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या महिला हक्क न्याय हक्क परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव सोनल पटेल, हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार शिरिष चौधरी, आमदार अमित झनक, भावना जैन, धुळे काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?