Manoj Jarange | ‘…तर भाजपचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नसतो’; मनोज जरांगेच्या तोंडी विरोधकांची भाषा ? 

बीड | गळ्य काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) हे सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांच्यावर विरोधकांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा देखील आरोप झाला आहे मात्र तरी देखील त्यांच्याकडून सातत्याने मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Phadnis) यांच्यावर जहरी टीका करत आहेत.

खरतर मराठा समजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले योगदान सर्व समाज जाणतो मात्र तरीही जरांगे (Manoj Jarange) हे सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र नुकतेच बीडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही, असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मी वडवणी मधूनजाहीर आव्हान करतो, तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देत नाही. फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही. दुसरे कुणीही निवडून द्या पंरतु यांचा कोणीही निवडणून येऊ द्यायचा नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

TV9ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही. त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी SIT चौकशी सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊद्या. मी सागर बंगल्यावर जाऊन दहा लाख घेऊन जातो. मराठ्यांनी व्यसनापासून लांब रहा, आपली प्रगती कोणीही रोकू शकत नाही. जामनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा पेला आणि पोहे खाल्ले, असं मनोज जरांगे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?