“राहुल गांधींना अटक करा” केतकी चितळे प्रकरणाचा उल्लेख करत रणजीत सावरकरांची मागणी

Mumbai : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी विधान केलं. भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी  सावरकर यांच्यावर टीका केली.

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

दरम्यान,  भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका मराठी महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान केल्याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत बदनामी करत आहेत. याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत,अशी टीका त्यांनी केली आहे. (Ranjit Savarkar demands arrest Rahul Gandhi)

राहुल गांधींना अटक केली पाहिजे. कारण याच महाराष्ट्रात शरद पवारांवर ट्वीट रिट्वीट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकरांचा असा अपमान होणार असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.