उरली सुरली शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारे यांना शिवसेनेत पाठवले?

Mumbai – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)) यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही असा दावा केला आहे. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेला आज उत्तर देताना त्यांनी आपण कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पदाधिकारी नव्हतो असा दावा केला होता. अंधारे यांचा या दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे (Rahul Londhe) यांनी पुराव्यासह खोडून काढला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश असल्याच्या बातमीचे कात्रण लोंढे यांनी माध्यमाच्या समोर आणले आहे. खोटे बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे सुषमा अंधारे यांचे हे वर्तन असून उरली सुरली शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना शिवसेनेत पाठवले असल्याचा घणाघाती आरोप लोंढे यांनी अंधारे यांच्यावर केला आहे.