इंधन दरवाढ करणं ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे; भाजप नेत्याचा घरचा आहेर

मुंबई – राज्यासह देशात इंधनाच्या (fuel) किमतीत दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या महागाई विरोधात जनतेत आता रोष निर्माण होऊ लागला आहे. सर्वसामान्य नागरिक आता मोदी सरकारला (Modi Government)मते देणे ही मोठी चूक असल्याचं सांगू लागले आहेत.

जनता पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी करत असताना भाजपानेते मात्र अनेक भावनिक मुद्द्यांना पुढे आणून राजकारण करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramaniyam Swami)यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. इंधन दरवाढ करणं ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधी आहे, अशी प्रतिक्रिया सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिली आहे.

इंधनाच्या किंमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणं योग्य नाही, असंही स्वामी यांनी म्हटलं. स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वरील ट्वीट केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. स्वामी यांनी केलेल्या या टीकेवर सध्या एकही भाजपचा मोठा नेता बोलायला तयार नसल्याचे चित्र आहे.