राहुल गांधींच्या हिंदुत्वाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याची राज ठाकरेंनी उडवली खिल्ली, म्हणाले….

नाशिक : जयपूर येथे महागाई विरोधात काल आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले. भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या तीन-चार मित्रांनी 7 वर्षात देश उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले, ‘हा देश हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात महागाई आणि वेदना होत असतील तर हिंदुत्ववाद्यांनी हे काम केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे.हिंदुत्व आणि हिंदुत्व हे दोन भिन्न शब्द असल्याचे सांगताना राहुल म्हणाले की, ज्याप्रमाणे दोन आत्म्यांमध्ये एक आत्मा असू शकत नाही, त्याचप्रमाणे दोन शब्दांचा एकच अर्थ असू शकत नाही कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी यांचे वक्तव्य मी वाचले. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही आणि या देशामध्ये हिंदूंचे राज्य आले पाहिजे. मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का?,” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

देशात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसला बाजूला ठेवायच असं कधी म्हणतात, तर शिवसेना म्हणते काँग्रेसशिवाय भाजपला दूर ठेवता येत नाही, यासंदर्भात राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या राजस्थानच्या सभेतीली विधानाचा उल्लेख केला. मी आत्ता राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं, मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. या देशामध्ये हिंदूंचं राज्य आलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणतात. मग, आत्ता काय आफ्रिकन लोकं राहतात का येथे, कोण करतंय राज्य?, असे म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवली.