आम्ही वारंवार सांगितलं की सत्तेतून बाहेर पडूयात, मात्र उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही – भुमरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुलाखत घेतली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतरच्या ह्या पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपावरही टीका केली आहे.

ठाकरेंनी विरोधकांवर टीका केल्यानंतर आता विरोधकांनी देखील जोरदार पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदार संदीपान भूमरे (Sandipan Bhumare) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी मुलाखत पाहिली नाही, मात्र एकच सांगतो आम्ही वारंवार सांगितलं की सत्तेतून बाहेर पडूयात, मात्र उद्धव ठाकरे यांनी आमचं ऐकलं नाही. म्हणून आम्ही उठाव केला. नाहीतर शिवसेना संपली असती असं देखील संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही अनेकदा उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडले पाहिजे, मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्हाला बाहेर पडावे लागले. म्हणून आम्ही बंड केले, नाहीतर शिवसेना संपली असती असे संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे.