IND VS ENG | ध्रुव जुरेलमध्ये दिसली धोनीची झलक! चपळता दाखवत कुलदीप यादवच्या मदतीने मिळवली इंग्लंडची मोठी विकेट

IND VS ENG | धर्मशाला कसोटीत इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सलामीवीर बेन डकेट 27 धावा करून बाद झाला. डकेटनंतर ऑली पोपही लवकरच मैदानाबाहेर पडला. तो 11 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने पोपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र कुलदीपच्या या विकेटमध्ये ध्रुव जुरेलने (IND VS ENG) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. ध्रुवने कुलदीपला एक चेंडू अगोदरच सांगितले होते की पोप पुढे सरकणार आहे.

खरंतर डकेट आणि जॅक क्रॉली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आले. यादरम्यान डकेट 58 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्याला कुलदीपने बाद केले. यानंतर कुलदीप आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याच्या चपळाईने ओली पोपलाही स्वस्ता बाद केले. ध्रुव जुरेल या सामन्यात विकेटकीपिंग करत आहे. पोपची खेळण्याची पद्धत पाहून त्याने कुलदीपला एक चेंडू अगोदरच इशारा दिला होता की तो पुढे सरकून खेळेल. याचा फायदा कुलदीपने घेतला आणि ध्रुवने त्याला यष्टीचीत केली. अशाप्रकारे पोप 11 धावा करून बाद झाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

ध्रुव जुरेलने दाखवलेल्या चपळतेनंतर त्याची तुलना माजी यष्टीरक्षक एमएस धोनीशी होऊ लागली आहे. धोनीही यष्टीमागून गोलंदाजांना असेच सल्लेच देत विकेट्स घेण्यात मदत करत असे.

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं