आदर्श! आयपीएलमधील कमाईतील कोट्यवधी रुपये तरुण खेळाडूंसाठी खर्च करतोय संजू सॅमसन

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार असलेल्या संजू सॅमसनने (Sanju Samson) अनेक वेळा संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या मोसमातही संघाने धमाकेदार सुरुवात केली, पण प्लेऑफपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

दमदार फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधारपदामुळे संजू सॅमसनची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. क्रिकेट व्यतिरिक्त संजू आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आपल्या मदत करण्याच्या वृत्तीने लोकांची मने जिंकत आहे. संजू सॅमसन अनेकदा गरजू तरुण खेळाडूंना मदत करताना दिसला आहे, ज्यामुळे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. आताही आपल्या अशाच आदर्श कामामुळे तो चर्चेत आला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या ट्रेनरने एका मुलाखतीत सांगितले की, “संजू सॅमसनला आयपीएलमधून दरवर्षी सुमारे 15 कोटी रुपये मिळतात. या पैशातून तो किमान 2 कोटी रुपये देशांतर्गत खेळाडू आणि मुलांच्या मदतीवर खर्च करतो. संजू हा एक चांगला खेळाडू असण्यासोबतच एक उत्तम माणूस आहे. यामुळेच त्याच्या चाहत्यांची कमी नाही. संजू माझ्यासाठी दुसऱ्या धोनीपेक्षा कमी नाही.