Rajesh Kshirsagar | बाळ गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुस्ती मैदान घेणार

Rajesh Kshirsagar – लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः ज्या मोतीबाग तालमीत कुस्ती सराव करून कुस्ती कलेला राजाश्रय दिला त्या शाहू महाराजांच्या मोतीबाग तालमीला बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनेखाली असलेल्या,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्ल तयार करणाऱ्या संस्थानकालीन मोतीबाग तालमीच्या वसतिगृह बांधकामासाठी शासनाच्या मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत रुपये वीस लाखाचा निधी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तालीम संघाकडे सुपूर्त करण्यात आला याप्रसंगी तालीम संघाचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांच्या हस्ते राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रस्ताविक सरचिटणीस अँड महादेवराव आडगुळे यांनी केले.

याप्रसंगी तालीम संघाचे संस्थापक ज्येष्ठ कुस्ती अभ्यासक मार्गदर्शक कै .बाळ दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरात लवकरच भव्य कुस्ती मैदान घेणार असल्याची घोषणा राजेश क्षीरसागर यांनी केली.

याप्रसंगी सुरू असलेल्या बांधकामाची क्षीरसागर यांनी पहाणी केलीयावेळी पीजी मेढे आर के पोवार प्रदीप गायकवाड विष्णू जोशीलकर अशोक पोवार विनोद चौगुले संभाजी वरुटेमाणिक मंडलिक सरदार पाटील जयकुमार शिंदे अशोक माने निलेश देसाई संभाजी पाटील रणजीत मंडलिक बाजीराव कळंत्रे मारुतीराव कातवरे दीपक जाधव गजानन गरुड विजय सरदार विजय पाटीलचंद्रकांत सूर्यवंशी दादू चौगुलेचंद्रकांत चव्हाण आदीसहकुस्तीगीर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन