निष्ठावंत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजप विधान परिषदेसाठी संधी देणार का ?

पुणे – राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेतून सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील. मात्र भाजप आपला पाचवा उमेदवार रणांगणात उतरवेल अशी शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्याकाही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde), राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि गोपाल अग्रवाल यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान, या निमित्ताने पुन्हा एकदा भाजपच्या निष्ठावंत कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे देखील नाव चर्चेत येत आहे. शक्यता कमी असली तरीही कुलकर्णी यांना भाजप संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मेधा कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मेधा कुलकर्णी यांच्या जागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली होती. यावेळी स्थानिक पातळीवर नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले होते. पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे मेधा कुलकर्णी यांना निवडणूकीतून माघार घ्यावी लागली होती. आता कुलकर्णी यांना भाजप पुन्हा साधी देत त्याचा मान राखणार का हे पाहावे लागेल.