‘मी ईश्वर-अल्लाहची शपथ घेऊन सांगते की…’, राम मंदिर अभिषेकवरून ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

Ram Mandir Pran Pratishtha: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मंगळवारी (9 जानेवारी) राम मंदिराच्या (Ram Temple) अभिषेक सोहळ्याचा संदर्भ देत भाजपवर हल्ला चढवला. बॅनर्जी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचे उद्घाटन करून भाजप नाटक करत आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख ममता बॅनर्जी बंगालच्या जयनगरमध्ये म्हणाल्या, “मला राम मंदिराबद्दल विचारण्यात आले होते. मी सर्वांना एकत्र आणणाऱ्या उत्सवावर विश्वास ठेवते. निवडणुकीपूर्वी तुम्हाला जे हवे ते करा. ते नाटक करत आहेत. मला काही अडचण नाही. पण इतर समाजाच्या लोकांची उपेक्षा करणे योग्य नाही.”

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “मी देवाची शपथ घेते की, मी जिवंत असेपर्यंत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव कधीच होऊ देणार नाही. धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्यावर माझा विश्वास नाही.”

22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी बॅनर्जी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, परंतु बॅनर्जी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्तसंस्थेने अलीकडेच सूत्रांच्या हवाल्याने दिले होते.

पीटीआयशी बोलताना टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले होते की, “ममता बॅनर्जी किंवा टीएमसीच्या इतर कोणत्याही प्रतिनिधीने अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धर्मात राजकारण मिसळण्यावर आमचा विश्वास नाही.”

पीएम मोदी उपस्थित राहणार आहेत
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”