अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीच्या (Ram Navami 2024) निमित्ताने सूर्यदेवाने रामलल्लाचा सूर्यतिलक केला आहे. आज रामनवमीच्या दिवशी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाचा सूर्यतिलक करण्यात आला. दुपारी 12.01 वाजता सूर्याभिषेक सुरू झाला, जो सुमारे 5 मिनिटे चालला. सूर्याची किरणे रामललाच्या मस्तकावर पडली की, हे सारे दृश्य अलौकिक आणि दिव्य दिसले. रामललाच्या डोक्यावर सुमारे 5 मिनिटे सूर्य स्थिर राहिला.
दुसरीकडे, श्री रामजन्मभूमी (Ram Navami 2024) तीर्थ क्षेत्राने सोशल मीडियावर पोस्ट केले की, आज श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर श्री रामजन्मभूमी मंदिरात भगवान श्री रामलल्लाचा दिव्य अभिषेक करण्यात आला.
सत्यसंधान, निर्वानप्रद, सर्वहित, सर्वगुण-ज्ञान-विज्ञानशाली।
सघन-तम-घोर-संसार-भर-शर्वरी नाम दिवसेश खर-किरणमाली॥सूर्यकुल भूषण श्री रामलला के ललाट पर सुशोभित भव्य 'सूर्य तिलक' आज अखिल राष्ट्र को अपने सनातन गौरव से आलोकित कर रहा है।
जय जय श्री राम! pic.twitter.com/t0dO26tS1F
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 17, 2024
सकाळपासूनच राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर भगवान रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या संख्येने भाविक पोहोचले आहेत. रामनवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिराबरोबरच हनुमानगढीही मोठ्या संख्येने भाविकांनी फुलून गेली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :